मास्कने बिघडविले स्माइल
कोरोना महामारीने जगभरात लाखो जणांचा बळी घेतला, याचबरोबर अनेक प्रकारे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जपानमध्ये तर विचित्र प्रकरण समोर आले आहे. येथील लोक आणि विशेषकरून तरुणाईला आता योग्यप्रकारे हसणे देखील अवघड ठरले आहे. जपानमध्ये आता विशेष क्लासेसद्वारे लोकांना योग्यप्रकारे हसणे शिकविले जात आहे. या क्लासेस करता मोठे शुल्क भरावे लागत आहे. बहुतांश काळ मास्क वापरला जात असल्याने जपानचे लोक मनमोकळेपणाने हसणेच विसरून केले होते. प्रशिक्षणादरम्यान या लोकांना हॉलिवूड स्टाइलचे स्माइल शिकविले जात आहे. टोकियो आर्ट स्कुलचे अनेक विद्यार्थी हातात आरसा घेऊन हास्य सुधारण्याचा सराव करत आहेत. चेहऱ्याच्या दोन्ही बाजूच्या हिस्स्यांना रुंद करण्यासाठी ‘माउथ स्ट्रेचिंग’ एक्सरसाइज सुरू असून त्यांच्यासोबत एक प्रशिक्षक देखील असतो. त्यांच्या या ट्रेनरचे नाव कवानो असून हसण्याचे कौशल्य शिकविण्यासाठी त्या मोठे शुल्क आकारत आहेत. कवानो यांच्या विद्यार्थ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. यात केवळ तरुण-तरुणी नसून वृद्ध देखील यात सहभागी होत आहेत.
मास्कने हिरावून घेतले हास्य
कोरोना काळात जपानच्या लोकांनी मास्कच्या वापराचा नियम कसोशीने पाळला आहे. याचबरोबर तेथे विचित्र प्रकारचा आजारही फैलावत असतो, यामुळे जपानमधील लोक बहुतांश काळ मास्कचा वापर करत असतात. या मास्कच्या वापरामुळे लोकांना हास्याचाच विसर पडला. किमानपक्षी योग्यप्रकारे हसणेच ते विसरून गेले.
स्माइल एज्युकेशन
स्माइल ट्रेनर कवानो यांनी स्वत:च्या कंपनीला स्माइल एज्युकेशन नावाने नोंदणीकृत करविले आहे. एक वर्षात कवानो यांच्या विद्यार्थ्यांची संख्या 4 पट वाढली असून यात शासकीय अधिकारीही सामील आहेत. खासगी कंपन्यांचे प्रोफेशनल्स आणि विशेषकरून मार्केटिंग क्षेत्रात कार्यरत लोक त्यांच्याकडून प्रशिक्षण घेत आहेत. जपानमध्ये मास्कचा वापर सामान्य बाब आहे. कोरोनापूर्वी देखील लोक संक्रमणापासून वाचण्यासाठी मास्कचा वापर करायचे. काही लोक याचे फायदेही सांगतात. 55 टक्के जपानी लोक अद्याप मास्क वापरत असतात, असे कवानो यांनी सांगितले.
हॉलिवूड स्टाइल स्माइलिंग
कवानो यांच्यानुसार हॉलिवूड चित्रपटांमध्ये कलाकार ज्याप्रकारे ब्रॉड स्माइल देतात, ती सर्वात चांगली स्माइल आहे. मी स्वत:च्या विद्यार्थ्यांना क्लासेसमध्ये हीच स्टाइल शिकविते. तसेही आम्ही जपानी लोक हास्याप्रकरणी पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत मागे आहोत. याकरता काही कारणे देखील असू शकतात. परंतु हास्य जीवनाचा महत्त्वाचा हिस्सा आहे. ही कला आम्ही आता आत्मसात करू लागलो आहोत असे कवानो यांनी म्हटले आहे.