मराठा समाज व वकिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप
कोल्हापूर प्रतिनिधी
आक्षेपार्ह विधान कऊन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडून मराठा समाज व वकिलांच्या भावना दुखावल्या आहेत, असा आरोप करत जिल्हाधिकार्यांची सखोल चौकशी कऊन त्यांची बदली करावी, यासह विविध मागण्यांचे निवेदन गुऊवारी सकल मराठा समाज व महाराष्ट्र व गोवा बार असोसिएशनतर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविण्यात आले.
सकल मराठा समाज व बार असोसिएशनच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष येथे जाऊन हे निवेदन सादर कऊन ते मुख्यमंत्र्यांना पाठविण्याची विनंती केली.निवेदनात म्हंटले आहे की, मराठा आरक्षण न्यायालयात टिकण्यासाठी गेल्या महिन्यापासून नवीन दिशा घेवून कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्हयातील मराठा बांधव नव्या जोमाने प्रयत्न करीत आहे. मंत्री, खासदार, आमदार यांना भेटून कागदपत्रे दाखवून मराठा आरक्षण न्यायालयात कसे टिकेल ? हे सांमजस्याने व शांततेने अखंडित प्रयत्नात आहेत. याचाच एक भाग म्हणून दि. 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिना दिवशी ध्वजारोहणानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकल मराठा समाजाच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली. या बैठकीसाठी 8 दिवस अगोदर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पत्र देऊन विविध जिल्हयातील किमान 300 मराठा समाजबांधव उपस्थित राहणार असून ही बैठक छत्रपती ताराराणी हॉलमध्ये घ्यावी, अशी विनंती केली होती. परंतु जिल्हाधिकारी रेखावार यांनी ही बैठक अत्यंत लहान हॉलमध्ये घेतली. ज्यामुळे बाहेरच्या जिल्हयातून आलेल्या मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना
बैठकीत प्रवेश मिळू शकला नाही. त्यामुळे तेथे गोंधळ उडाला. परंतु उपमुख्यमंत्री पवार यांनी स्वत: पुढाकार घेऊन या कार्यकत्यांची समजूत काढली. त्यानंतर त्यांच्याशी स्वतंत्रपणे चर्चा केली. त्यावेळी उपस्थित असलेल्या जिल्हाधिकारी रेखावार यांनी अचानकपणे मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण दिल्यास दंगल होईल, असे असे चूकीचे आणि बेजबाबदार विधान केले. त्याचे पडसाद ही बैठक संपल्यानंतर उमटले. याच्या बातम्या वृत्तपत्रा छापून आल्या. त्यामुळे मराठा समाजामध्ये संतापाची लाट उसळली. तरीही जिल्हाधिकारी यांना लेखी पत्र देऊन यासंदर्भात चर्चा करण्यासाठी बैठक बोलवा, अशी विनंती केली. जिल्हाधिकारी यांच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे त्यांनी टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला परंतु समाजाच्या दबावामुळे मंगळवार दि. 22 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कक्षामध्ये बैठक घेण्यात आली. यावेळी या आक्षेपार्ह विधानासंदर्भात सकल मराठा समाज बांधव व वकिलांनी जिल्हाधिकार्यांना विचारणा केली. त्यावर संतप्त झालेल्या जिल्हाधिकार्यांनी वकील व वकील व्यवसाय बदनाम होईल, समाजामध्ये त्यांचा स्तर खालावला जाईल अशा प्रकारची आक्षेपार्ह विधाने पुन्हा कऊन भावना दुखावल्या.
एकंदरीत जिल्हाधिकारी रेखावार यांच्या या अक्षेपार्ह विधानावरून ते मराठ्यांचा द्वेष करत असल्याचे स्पष्ट होत आहे. तसेच वकिल व वकिल व्यवसायावरही त्यांच्यासारख्या ‘आएएस’ अधिकार्यांनी भाष्य करणे समाजहितासाठी घातक आहे. त्यामुळे शासनानेच स्वत:हून इंडियन पिनल कोड चे कलम 153 अ खाली जिल्हाधिकार्यांवर गुन्हा दाखल करावा. त्याचबरोबर या प्रकरणाची सखोल चौकशी करावी. समाजामध्ये तेढ निर्माण होऊन शांतता व सुरक्षेचा प्रश्न उभा राहण्यास कारणीभूत ठरल्याने जिल्हाधिकार्यांना त्वरीत बडतर्फ करण्यात यावे किंवा त्यांची बदली करावी. याबाबत कार्यवाही न झाल्यास जिल्हाधिकारी रेखावार यांच्याविरोत्त रस्त्यावर उतऊन आंदोलन केले जाईल.
निवेदनावर ॲड. बाबा इंदूलकर, बाबा पार्टे, दिलीप देसाई, संजय पवार, विजय देवणे, चंद्रकांत पाटील, अनिल घाटगे, रविकिरण इंगवले, प्रवीण पालव, संभाजी साळुंखे, ॲड. विवेक घाटगे, ॲड. शिवाजीराव राणे, रणजीत घाटगे, ॲड. प्रशांत देसाई, ॲड. महादेवराव आडगुळे, ॲड. प्रकाश मोरे आदींसह समाजबांधव व वकिलांच्या सह्या आहेत.