प्रतिनिधी /बेळगाव
सिंधुदुर्ग मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटी परिवारतर्फे संस्थेचे संस्थापक, मार्गदर्शक कै. मुकुंदराव विट्ठलराव परब यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सोसायटीच्या भाग्यनगर येथील मुख्य कार्यालयात झालेल्या या शोकसभेवेळी महादेव सावंत, पंढरी परब (मार्गदर्शक), अध्यक्ष सुनील गवस, संचालक रविंद्र केरकर, कृष्णा कुबल, बाबाजी राऊळ, संचालक मंडळ व सचिव इरोजी, कर्मचारीवर्ग व हितचिंतक उपस्थित होते.
सहकार क्षेत्रातील योगदान व मार्गदर्शन या त्यांच्या निःस्वार्थी कार्याबद्दल गौरवोद्गार काढण्यात आले. परब यांनी घालून दिलेल्या कार्यप्रणालीनुसार पुढील वाटचाल करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.