प्रतिनिधी/ बेळगाव
रेल्वेच्या फिश प्लेट चोरणाऱ्या तिघा जणांना रेल्वे सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे. शुक्रवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली असून त्यांच्याजवळून 16 फिश प्लेट जप्त करण्यात आल्या आहेत.
आरपीएफचे निरीक्षक एस. आर. कारेकर, उपनिरीक्षक हर्षराज मीना व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. अटक करण्यात आलेल्या महिलेसह तिघा जणांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे. सुलधाळ आणि सुळेभावी रेल्वेस्थानकांदरम्यान गस्तीवर असताना ही कारवाई करण्यात आली आहे.
या त्रिकुटाने रेल्वेरूळावरून चोरलेल्या 16 फिश प्लेट व 30 ईआर चिप्स जप्त करण्यात आल्या आहेत. हे साहित्य त्यांनी गांधीनगर येथील एका स्क्रॅपच्या अ•dयावर विकले होते. आरपीएफच्या अधिकाऱ्यांनी या अ•dयावर तपासणी करून आणखी 12 फिश प्लेटही जप्त केल्या आहेत.