अनिका, समन्यु, अर्णा, नमन, माहीम, आदित्य, ऐश्वर्या व जान्हवी, ध्रुव व दर्शन विजेते
बेळगाव : बेळगाव जिल्हा बॅडमिंटन संघटना आयोजित जिल्हास्तरीय विविध गटातील शटल बॅडमिंटन स्पर्धेत अनिका, अर्णा, नमन, तनिष्का, माहीम, आदित्या, ऐश्वर्या, अथर्व, सिद्धार्थ तर दुहेरीत ऐश्वर्या व जान्हवी, ध्रुव व दर्शन या जोडीने आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करीत विजेतेपद पटकाविले. महाबळेश्वरनगर येथील बेळगाव जिल्हा शटल बॅडमिंटन कोर्टवर आयोजित करण्यात आलल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत अंतिम सामन्यातून विविध गटात सामने घेण्यात आले. 11 वर्षाखालील मुलींच्या एकेरीत अंतिम सामन्यात अनिकाने आराध्याचा 21-18, 21-15 अशा गुण फरकाने तर मुलांच्या गटात समन्यु याने यशस याचा 21-18, 21-13 अशा गुण फरकाने पराभव करुन विजेतेपद पटकाविले. 13 वर्षाखालील मुलींच्या गटात अंतिम सामन्यात अर्ना हिने अल्ड्रिना हिचा 21-16, 18-21, 21-10 अशा कडव्या लढतीत तर मुलांच्या गटात नमनने प्रितमचा 21-9, 21-11 अशा गुण फरकाने पराभव करुन विजेतेपद पटकाविले. 15 वर्षाखालील मुलींच्या गटात तनिष्का कोरीशेट्टीने आदितीचा 21-5, 22-20 अशा गुणफरकाने तर मुलांमध्ये माहीमने तनुशचा 21-18, 21-16 अशा फरकाने पराभव करुन विजेतेपद पटकाविले. 17 वर्षाखालील मुलींच्या गटात तनिष्का कोरीशेट्टीने आदितीचा 21-15, 21-15 अशा गुण फरकाने तर मुलांमध्ये अदित्यने माहीमचा 21-14, 21-10 अशा गुण फरकाने पराभव करुन विजेतेपद पटकाविले.
19 वर्षाखालील मुलींच्या गटात ऐश्वर्याने तनिष्का कोरीशेट्टीचा 17-21, 21-12, 21-16 अशा गुण फरकाने तर मुलांच्या गटात अथर्वने आदित्याचा 21-14, 19-21, 21-15 अशा गुण फरकाने पराभव करुन विजेतेपद पटकाविले. महिलांच्या एकेरीत तनिष्का कोरीशेट्टीने ऐश्वर्याचा 21-13, 21-14 अशा गुण फरकाने तर पुरुष गटात आदित्य उपस्थित राहू न शकल्याने सिद्धार्थ ए. ला विजयी घोषित करण्यात आले. महिलांच्या दुहेरी अंतिम सामन्यात ऐश्वर्या व जान्हवी या जोडीने आदिती व अर्ना या जोडीचा 21-16, 21-12 अशा गुण फरकाने तर पुरुष दुहेरीत ध्रुव व दर्शन या जोडीने आदित्या व सिद्धांत या जोडीचा 18-21, 21-16, 21-15 अशा गुण फरकाने पराभव करुन विजेतेपद पटकाविले. सामन्यानंतर प्रमुख पाहुणे बेळगाव उत्तरचे आमदार राजू शेठ, बॅडमिंटन संघटनेचे सचिव अशोक पाटील, अभय हर्दी, आनंद हावण्णावर, अजय असुंडी, मनोज पाटील, ए. जी. मंथेरो, एस. एन. हुन्नरगिकर, आर. एस. नाईक, महादेव मळगी, मुर्गेश धरलापूर यांच्या हस्ते विजेत्या व उपविजेत्या बॅडमिंटनपटूंना चषक, प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेसाठी पंच म्हणून एनआयएस बॅडमिंटन प्रशिक्षक भूषण अणवेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.