करीमा बलोच हत्येबाबत ‘बीएचआरसी’कडून प्रश्नांची सरबत्ती
वृत्तसंस्था/ ओटावा
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो आता करीमा बलोचच्या हत्येने घेरले गेले आहेत. खलिस्तान समर्थक नेता हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येचा आरोप भारतावर केल्यापासून त्यांना आता कॅनडाच्या नेत्यांनीही कोंडीत पकडण्यास सुऊवात केली आहे. निज्जर यांच्या हत्येवरून भारतावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या ट्रूडोंना आता प्रश्न विचारले जात आहेत. कॅनडाच्या बलुच ह्युमन राईट्स कौन्सिलने (बीएचआरसी) पॅनडाच्या पंतप्रधानांना लक्ष्य करत पॅनडात स्थायिक झालेल्या बलूच मानवाधिकार कार्यकर्त्या करीमा बलोचच्या कथित हत्येबद्दल आजपर्यंत एक शब्दही न बोलल्याबद्दल विचारणा केली आहे. कौन्सिलने त्यांच्या मौनावर प्रश्न उपस्थित करत करीमाच्या अपहरण आणि कथित हत्येप्रकरणी कोणतीही कारवाई न केल्याबाबत शंका उपस्थित केली. करीमाला बलुचिस्तानला पाकिस्तानपासून वेगळे करायचे होते आणि ती बलुच चळवळीचा मुख्य चेहरा होती. करीमा पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयच्या विरोधातही होती. पॅनडामध्ये आल्यानंतर करीमाला आयएसआयकडून धमक्या येत होत्या. दरम्यान, 2020 मध्ये ती टोरंटोमध्ये मृतावस्थेत आढळली होती. बीएचआरसीने आता ट्रूडो यांना पत्र लिहून करीमा प्रकरणात पाकिस्तानी एजन्सींचा सहभाग असल्याचे स्पष्ट असताना कोणतीही कारवाई का केली नाही, अशी विचारणा केली आहे.