सोयाबीनपासून अनेक डिश बनवल्या जातात. त्या चविष्ट तर असतातच शिवाय आरोग्यासाठीही खूप फायदेशीरही असतात. सोयाबीन मध्ये फायबर आणि प्रथिने भरपूर प्रमाणात असतात.तसेच सोया तुकड्यांमध्ये कॅल्शियम, झिंक, तांबे आणि इतर जीवनसत्त्वे समृद्ध असतात, जे हाडांसाठी आवश्यक घटक आहेत. आज आपण सोयाबीनपासून बनणारी एक डिश पाहणार आहोत. जी खूप चविष्ट लागते आणि झटपट बनते
साहित्य
१ वाटी सोयाचंक्स
कोथिंबीर
बारीक चिरलेला कांदा
अर्धी वाटी बेसन
तिखट
मीठ
धने-जिरे पावडर
तेल
पाणी
कृती
सर्वप्रथम एका भांड्यामध्ये पाणी उकळत ठेवा. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये सोयाचंक्स घाला. आणि ५ मिनिटे शिजू द्या. आता त्यातील सर्व पाणी काढून घ्या. आणि मिक्सरच्या भांड्यामधे कोथिंबीर आणि सोयाबीन घालून बारीक वाटून घ्या. आता त्यामध्ये चवीनुसार मीठ, बेसन, लाल तिखट, धने- जिरे पावडर, बारीक चिरलेला कांदा घालून पीठ छान मळून घ्या. आता पिठाचे गोळे करून घ्या. आणि गरम तव्यावर थापून घ्या. आणि दोन्ही बाजुंनी खरपूस भाजून घ्या. तयार झालेले गरमागरम थालीपीठ टोमॅटो सॉस सोबत सर्व्ह करा.