वृत्तसंस्था /व्हॅंकुव्हर (कॅनडा)
2023 च्या रॉड लेव्हर चषक सांघिक टेनिस स्पर्धेतून ग्रीकच्या स्टिफॅनोस सित्सिपसने दुखापतीमुळे शेवटच्या क्षणी माघार घेतली आहे. या स्पर्धेत सित्सिपस युरोप संघाचे प्रतिनिधीत्व करीत होता. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या युरोप संघात आता सित्सिपसच्या जागी आर्थर फिल्सचा समावेश करण्यात आला आहे. लेव्हर चषक सांघिक टेनिस स्पर्धेत फ्रान्सच्या फिल्सचे पदार्पण राहिल. तसेच होल्गेर रुनेने पाठदुखापतीच्या समस्येमुळे या स्पर्धेतून माघार घेतली आहे. आता रुनेच्या जागी स्पेनच्या फोकिनाचा समावेश करण्यात आला आहे.