खेड प्रतिनिधी
गणेशोत्सव कालावधीत कोकण मार्गावर धावणाऱ्या रेल्वेगाड्यांना प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी दादर-सावंतवाडी तुतारी स्पेशलला 5 अतिरिक्त डबे जोडण्याचा निर्णय रेल्वे पशासनाने घेतला आहे. त्यानुसार ही एक्स्पेस 27 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर या कालावधीत 24 डब्यांची धावणार आहे.सद्यस्थितीत ही एक्स्पेस नियमितपणे 19 डब्यांची धावते. गणेशोत्सवात उसळणारी गर्दी लक्षात घेवून अतिरिक्त डबे जोडण्यात येणार आहे. यामध्ये एसी थ्री-1, स्लीपर-2 व सेकंड सिटींग-2 डब्यांचा समावेश आहे.