प्रतिनिधी /मडगाव
शुक्रवार दि. 27 मे रोजी कोकण रेल्वे स्थानकाच्या मागच्या बाजूस रिंग रोडचे काम सद्या सुरू असून त्यासाठी उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या शेडमधून 29 हजार रूपये किंमतीचे दोन मोबाईल चोरीला गेल्याची तक्रार जीएसआयडीचे कंत्राटदार सतीश नार्वेकर यांनी मडगाव पोलीस स्थानकात नोंद केली होती. या चोरीचा तपास लावण्यात मडगाव पोलिसांना यश आल आहे.
ही चोरी दुपारी 3.30च्या दरम्यान झाली होती. या चोरी प्रकरणी मडगाव पोलिसांनी होलीबादशाह मुल्ला (37 वर्षे) रा. दाबोळी आणि अस्लम कलाईगर (26 वर्षे) रा. वास्को यांना अनुक्रमे मडगाव आणि धारवाड येथून अटक करण्यात आली व त्यांच्याकडून दोन मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत.
या प्रकरणाचा तपास पीएसआय विश्वजित ढवळीकर, पीएसआय सागर धाटकर, एएसआय दिलकुश वेळीप, हेड कॉन्स्टेबल गोरक्षनाथ गावस, हेड कॉन्स्टेबल, एन. शामीर, पोलीस हवालदार विशाल प्रभू, हेड कॉन्स्टेबल-चालक- प्रसाद बोरकर यांनी केला आहे. त्यांना मडगाव पोलीस निरीक्षक सचिन एस. नार्वेकर आणि पोलीस उपअधीक्षक शिवेंदू भूषण यांचे मार्गदर्शन लाभले.