हजगोळी येथील घटना : चंदगड रेस्क्यू टीमच्या साहाय्याने शोधण्याचा प्रयत्न
तुडये /वार्ताहर
बेळगांव-पॅम्प येथील दोन सख्खे भाऊ तिलारी धरणाच्या पाण्यात बुडाल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. रेहान अल्ताफ खान (वय 15) आणि मुस्तफा अल्ताफ खान (वय 12) अशी बुडालेल्या दोन भावांची नावे आहेत.
याबाबत घडलेली घटना अशी
कॅम्प बेळगाव येथील अल्ताफ खान हे पत्नी, मुलगी, दोन मुले असे कुटुंबातील सदस्य हजगोळी (ता. चंदगड) गावा शेजारील चाळोबा मंदिर परिसरातील निसर्गरम्य ठिकाणी पर्यटनासाठी आले होते. दोन्ही मुले पाण्यात हातपाय धुण्यासाठी गेले असता, या ठिकाणी असलेल्या खोलीचा अंदाज आला नसल्याने बुडाले.
घटनेची माहिती चंदगड पोलिसांना दिल्यानंतर, सहाय्यक पोलीस निरीक्षक, कांबळे, हवालदार अमोल पाटील, हवालदार किल्लेकर यांनी घटना स्थळी भेट देत, चंदगड रेस्क्यू टीमच्या साहाय्याने त्यांना शोधण्याचे प्रयत्न केला. मात्र अंधार आणि पावसाची सुरूवात झाल्याने, शोधमोहिम थांबवण्यात आली.
रविवारी सकाळी पाण्यात त्यांचा शोध घेण्यात येणार आहे.