खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित आलेल्या बैलगाडा शर्यतीमध्ये अपघात घडला असून यामध्ये दोन बैलांचा जागीच मृत्यु झाल्याची घटना घडली आहे.
सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील तांदूळवाडी येथे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. दुपारच्या सुमारास झालेल्या या घटनेत बैलगाडाने चाकोरी सोडल्याने थेट कृष्णा नदी पात्रात बैलगाडा गेला. त्यामुळे दोन बैलांचा जागीच मुत्यू झाला असून बैलगाडा चालकाने उडी टाकल्याने तो बचावला. ही घटना दुपारी दिडवाजल्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेने बैलगाडा शौकीनांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशी दुर्दैवी घटना झाल्याने या बैलगाडा शर्यती रद्द करण्यात आली आहे.