क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
शिमोगा येथे कर्नाटक राज्य संघटना व शिमोगा शहर कराटे संघटनेच्यावतीने दि. 21 व 22 रोजी झालेल्या कुमती व कटा या प्रकारात 12 वर्षे वयोगटात प्राची प्रल्हाद गावकर हिने दोन सुवर्णपदके मिळविली. प्राची ही मजगाव येथील रहिवासी असून ती सध्या मच्छे येथील डिव्हाईन मर्सी इंग्रजी माध्यमच्या प्राथमिक शाळेत शिकत आहे. तिला मजगाव येथील प्रशिक्षक विठ्ठल भोजगार व गजेंद्र काकतीकर यांचे मार्गदर्शन लाभले. प्राचीला बालपणापासूनच कराटेची आवड असल्याने तिने यापूर्वीही अनेक स्पर्धांतून अनेक बक्षिसे मिळविली आहेत.