फरार चोरट्यांच्या मागावर पोलीस
वार्ताहर,उत्तूर
Kolhapur Crime News: उत्तूर येथे गुरुवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास चोरीचा प्रयत्न करणाऱ्या तीन पैकी एका चोरट्याला पकडण्यात ग्रामस्थांना यश आले.ताब्यात घेतलेल्या चोरट्याचे नाव पवन रामसेवक शर्मा (रा.खाडीद, ता.गोस्मी, जि.भिंड, मध्यप्रदेश) असे असून त्याच्याकडून पोलिसांनी दोन गावठी बंदुका व नऊ जिवंत राऊंड जप्त केली आहेत.याबाबतची फिर्याद दिनकर कुंभार यांनी पोलिसात दिली
कुंभार हे अवधूत ज्वेलर्स दुकान बंद करून घरी जात असताना दुचाकीवरून आलेल्या तीन चोरट्यांनी त्यांच्या हातातील बॅग हिसकाविण्याचा प्रयत्न केला.त्यावेळी कुंभार यांनी आरडाओरडा केला.तेथे उपस्थित असलेल्या सुशांत आपके यांनी चोरट्यांशी दोन हात केले.या झटापटीत आपके यांच्यावर चोरट्यांनी धारधार शस्त्राने हल्ला केला.त्यात ते जखमी झाले.या झटापटीत एका चोरट्याला पकडण्यात ग्रामस्थांना यश आले.आणखी दोघे चोरटे फरार असून पोलीस त्यांच्या मागावर आहेत.ही टोळी मोठी असल्याच्या शक्यतेने पोलीस त्या अनुषंगाने तपास करीत आहेत.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज जाधव करीत आहेत.
अधिक वाचण्यासाठी- Kolhapur Election: पाच ग्रामपंचायतींसाठी 1 नोव्हेंबरला आरक्षण सोडत