ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर लोणावळ्यातून बाहेर पडण्याच्या मार्गावर आज ग्रँटी बसविण्यात येणार आहे. त्यामुळे दुपारी 12 ते 2 या वेळेत या मार्गावरील पुण्याच्या दिशेने येणारी वाहतूक पूर्णपणे बंद असणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.
पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर मागील काही दिवसांपासून अपघातांचे प्रमाण वाढले आहे. हीच गोष्ट लक्षात घेता, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून ओव्हरहेड गॅन्ट्री बसवली जाणार आहे. याच गॅन्ट्रीवर पुढच्या काळात सीसीटीव्ही बसवले जाणार आहेत. गॅन्ट्री बसविण्यासाठी दुपारी 12 ते 2 या वेळेत पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद असेल. दरम्यान, वाहतूक खंडाळा एक्झिट मार्ग म्हणजेच जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरून वळविण्यात आली आहे. वळवण येथील नाक्यावरुन पुन्हा पुण्याच्या दिशेने एक्स्प्रेस वेवरुन जाता येणार आहे.