खेड / प्रतिनिधी
कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या राजधानी एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाचे 36 हजार रुपये किंमतीचे दोन मोबाईल चोरीस गेल्याची तक्रार येथील पोलीस स्थानकात करण्यात आली आहे. याप्रकरणी सत्या दास आय बी (त्रिवेंद्रम-केरळ) यांनी तक्रार दाखल केली आहे.
ते निजामउद्दीम रेल्वेस्थानकावरून सकाळी 6.16 वाजता सुटणाऱ्या 14432 क्रमांकाच्या राजधानी एक्स्प्रेसमधून कोच नं. ए-3 मधील 1, 2, 3, 4 या आसनावर बसून कुटुंबासह प्रवास करत होते. त्यांनी 15 हजार रूपये किंमतीचा नोकिया कंपनीचा व 16 हजार रूपये किंमतीचा जिओ कंपनीचा मोबाईल चार्जिंगसाठी लावून आसनावर ठेवला होता. राजधानी एक्स्प्रेस येथील रेल्वेस्थानकात आली असता त्यांना मोबाईल चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार त्यांनी पोलीस स्थानकात धाव घेत तक्रार दाखल केली.