महिलां उमेदवारांनी मिळविला पहिला मान. पंचायत निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज.
डिचोली/प्रतिनिधी
डिचोली तालुक्मयातील 17 पैकी दोन पंचायतींमधील दोन महिला माजी पंचात्रत सदस्यांनी आपला उमेदवारी अर्ज पहिल्याच दिवशी सादर केला. अर्ज भरण्याच्या बाबतीत महिला उमेदवारांनी पहिला मान मिळविला आहे. नार्वे व वन म्हावळींगे कुडचिरे पंचायतीतील माजी पंचसदस्यांनी उमेदवारी मामलेदार तथा निवडणूक अधिकारी लक्ष्मीकांत कुट्टीकर यांच्याकडे दाखल केली.
नार्वे पंचायतीच्या पंचसदस्या तथा माजी सरपंचा प्रति÷ा मिशाळ यांनी प्रभाग क्र. 2 मधून आपला उमेदवारी अर्ज सादर केला. तर वन म्हावळींगे कुडचिरे पंचायतीच्या प्रभाग क्र. 3 मधून पंचसदस्या ज्योती म्हावळींगकर यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला. इतर अनेक उमेदवारांनी अर्ज भरण्यासाठी नेले असून आज मंगळ. दि. 19 पासून मामलेदार कार्यालयात उमेदवरांची गर्दी पहायला मिळणार आहे.
डिचोली तालुक्मयात एकूण 18 पंचायती आहेत. परंतु हि निवडणूक 17 पंचायतींमध्ये होणार आहे. साखळी मतदारसंघातील हरवळे या पंचायतीची निवडणूक या सार्वजनिक निवडणुकीत होत नाही. सदर पंचायतीची निवडणूक पुढील दोन वर्षांनंतर होणार आहे.
डिचोली मतदारसंघात मुळगाव, अडवलपाल, साळ, मेणकुरे धुमासे व लाटंबार्से अशा पाच पंचायती आहेत. मये मतदारसंघात मये वायंगिणी, नार्वे, शिरगाव, पिळगाव, कारापूर सर्वण व वन म्हावळींगे कुडचिरे अशा सहा पंचायती आहेत. या मतदारसंघात येणारी चोडण माडेल हि पंचायत तिसवाडी तालुक्मयात येत असल्याने तिची निवडणूक प्रक्रिया तिसवाडी येथे होते. तर साखळी मतदारसंघात कुडणे, नाव्हेली, आमोणा, सुर्ल, वेळगे, पाळी कोठंबी या सहा पंचायतींची निवडणूक होणार आहे. या मतदारसंघातील हरवळे पंचायतींची निवडणूक दोन वर्षांनंतर होणार आहे.
डिचोलीत निवडणूक यंत्रणा सज्ज
डिचोली तालुक्मयातील सतरा ग्रामपंचायत निवडणुकीसाठी डिचोली मामलेदार कार्यालयात अर्ज स्वीकारण्यात प्रारंभ झाला असून त्यासाठी दोन निवडणूक अधिकारी नियुक्त करण्यात आल्याची माहिती मामलेदार तथा निवडणूक अधिकारी लक्ष्मीकांत कुट्टीकर यांनी दिली.
मामलेदार कार्यालयात एका ठिकाणी दहा पंचायती तर दुसऱया ठिकाणी सात पंचायतीचे अर्ज स्विकारण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सकाळी दहा ते दुपारी एक पर्यंत अर्ज स्विकारण्यात येतील, अशी माहिती मामलेदार कुट्टीकर यांनी दिली.
पंचायत निवडणूक पक्ष पातळीवर नसले तरी आतून काही उमेदवारांना पाठींबा देण्याची रणनिती राजकीय पक्षांकडून आखली जाणार असल्याचे दिसून येते. एकाहून अधिक उमेदवार रिंगणात उतरत असल्याने थेट भूमिका घेणे पक्ष नेते टाळतील. मात्र आपल्या मर्जीतील उमेदवार निवडून यावेत यासाठी कार्यकर्ते कार्यरत असतील असे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे डिचोली तालुक्मयातील ग्रामीण भागातील राजकीय वातावरणात रंग चढणार आहे.