धारबांदोडा : कासावली मोले येथे राष्ट्रीय महामार्गावर नव्याने बांधण्यात येणाऱ्या साकवाच्या ख•dयात स्कॉर्पिओ गाडी कलंडल्याने दोन किरकोळ जखमी झाले आहे. चित्रदुर्गा कर्नाटक येथील सात प्रवासी या कारगाडीमध्ये होते. सुदैवाने मोठा अनर्थ टळला असून या प्रकाराला साकव बांधणारा ठेकेदार जबाबदार असल्याचे स्थानिकांचे मत आहे. कुळे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर अपघात रविवारी पहाटे सुमारे पावणे चार वाजण्याच्या सुमारास घडला. चित्रदुर्गा कर्नाटक येथील सात पर्यटक पर्यटनासाठी केए 16 एम 5210 स्कॉर्पिओ गाडीने गोव्यात पर्यटनासाठी आले होते. ते रविवारी पहाटे माघारी जाताना हा अपघात घडला. अपघातात दोन व्यक्तीना किरकोळ दुखापत झाली असून इतर प्रवासी ठिक असल्याची माहिती कुळे पोलिसांनी दिली आहे. सध्या कासावली येथे उतरणीवर पावसाळयात पाणी साठत असल्याने साकव बांधण्याचे काम हातात घेण्यात आले आहे. एका बाजूने साकव बांधून पुर्ण झाला असून मुख्य रस्त्यावर बांधकाम सुरू आहे. काम पुर्ण झालेल्या बाजूने सध्या वाहने सोडण्यात येत आहेत. येथे वळण असून उतरणी आहे. त्यामुळे ठेकेदाराने विशेष काळजी घेण्याची आवश्यकता होती असे स्थानिकांचे मत आहे. महत्वाचे म्हणजे ज्या ठिकाणी साकव बांधला जात आहे. त्याठिकाणी पावसाळ्यात प्रचंड प्रमाणात रस्त्यावर पाणी साचत असल्याने वाहन चालकांना गाडी चालवताना कसरत करावी लागत होती. गेल्या पावसाळ्यात येथे पाणी साचल्याने पाण्dयाचा अंदाज न आल्याने एका कार गाडीला अपघात झाला होता. सध्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने साकव बांधण्याचे काम हातात घेतल्याने अनेकांनी समाधान व्dयाक्त केले होते. मात्र ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे आजचा अपघात झाल्याचे चालकांनी व स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. कुळे पोलीस स्थानकाचे हवालदार शिवदास मावळींगकर यांनी पंचनामा केला. निरीक्षक सगुण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
Previous Articleहेडलॅण्ड सड्यावरील गुंडगीरीचा निषेध
Next Article पेडण्यात रवींद्र भवन उभारणार : मंत्री गावडे
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.