बारमेर : राजस्थानमधील बारमेरमधील बैतू पोलीस स्टेशन हद्दीतील भीमडाजवळ रात्री 9 वाजता हवाई दलाचे प्रशिक्षणार्थी मिग लढाऊ विमान कोसळले. या दुर्घटनेत दोन पायलट हुतात्मा झाल्याचे रात्री उशिराने जाहीर करण्यात आले. अपघातानंतर विमानाला आग लागली आणि मिगचे अवशेष सुमारे अर्धा किलोमीटरपर्यंत पसरले होते. हवाई दलाकडून या घटनेच्या कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश देण्यात आले आहेत.
या दुर्घटनेबाबत ग्रामस्थांनी पोलीस व प्रशासनाला माहिती दिली. पोलीस आणि प्रशासन घटनास्थळी पोहोचल्यानंतर अपघातात पायलट गंभीर जखमी झाल्याचे आढळून आले. विमान कोसळल्यानंतर आजुबाजुच्या परिसरात आग लागली होती. याप्रसंगी आजूबाजूचे लोग मोठय़ा संख्येने जमा झाले. रात्री उशिरापर्यंत बचावकार्य सुरू होते.