ऑनलाईन टीम / तरुण भारत :
भिवंडीच्या खाडीपार भागात आज पहाटे दोन मजली इमारत कोसळली. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला. अचानक इमारत कोसळल्याने नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाडय़ा दाखल असून, बचावकार्याला वेग आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडीच्या खाडीपार भागातील मुलचंद कंपाऊंडमध्ये असलेली जी प्लस टू इमारत पहाटे कोसळली. ही इमारत 30 ते 35 वर्ष जुनी होती. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली सापडून एकाचा मृत्यू झाला आहे. माजिद अन्सारी (वय 25) असे या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. इमारतीखाली 8 दुकाने होते. ही सर्व दुकाने ढिगाऱ्याखाली दाबली गेली. यातील एक कापड दुकान होते. त्याचे दुकानदार रात्री तिथेच झोपले होते. ते ढिगाऱ्याखाली अडकून बसले होते.
अधिक वाचा : भिवंडीत दोन मजली इमारत कोसळली, एकाचा मृत्यू
घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाडय़ा दाखल झाल्या असून, जेसीबीच्या सहाय्याने ढिगारा हटविण्याचे काम सुरू आहे. तसेच इमारतीच्या ढिगाऱ्याखाली कोणी दबले आहे, का याचा शोध सुरू आहे.