जिल्हाधिकारी डॉ.राजा दयानिधी यांनी दिली माहिती
सांगली/सांगली
कोयना व वारणा धरणातून होणाऱ्या पाण्याचा विसर्गामुळे सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीच्या पाणीपातळीमध्ये वाढ होत आहे. या अनुषंगाने दक्षता घेण्याच्या दृष्टीने सांगली जिल्ह्यात दोन एन.डी.आर.एफ पथके दाखल झालेली आहेत. अद्याप जिल्ह्यामध्ये कोणतीही पूर परिस्थिती नाही. तथापी दक्षता घेण्याच्या अनुषंगाने सदरची पथके उपलब्ध ठेवण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सांगितले.
एन. डी. आर. एफ पुणे चे सहायक कमांडट सारंग कुर्वे यांच्या नेतृत्वाखाली एक पथक आष्टा (मनोजकुमार शर्मा पथक प्रमुख) व एक पथक सांगली मध्ये (रघुवंश, पथक प्रमुख) ठेवण्यात येणार आहे. या पथकामध्ये प्रत्येकी २२ जवान व प्रत्येकी चार बोटी उपलब्ध आहेत. एनडीआरएफच्या अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या समवेत चर्चा करून सद्यस्थिती जाणून घेतली.