श्रीनगर
जम्मू-काश्मीरमधील अनंतनागमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. येथील तंगापावा भागात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. पोलीस आणि सुरक्षा दलांची संयुक्त कारवाई सायंकाळपर्यंत सुरू होती. दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यानंतर रविवारी संध्याकाळी परिसराची नाकेबंदी करण्यात आली होती. लष्कर आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाकडून रात्रीच्यावेळीही गस्त ठेवण्यात आली. त्यानंतर सोमवारी सकाळपासून अधिक व्यापकपणे सुरू केलेल्या मोहिमेवेळी दोघांचा खात्मा करण्यात यश आल्याचे जम्मू-काश्मीर पोलिसांकडून सांगण्यात आले.