धनलाभाच्या हव्यासापोटी एका डॉक्टर पती – पत्नीने दोन महिलांचा बळी दिला आहे. ही घटना केरळच्या पथमथिट्टा जिल्ह्यात घडली आहे. या घटनेत तीन मारेकऱ्यांचा समावेश असून बळीनंतर त्यांनी मांस शिजवून खाल्ले आहे. अशी माहिती शहर पोलीस आयुक्त नागराज यांनी दिली आहे.
भगवान सिंह आणि त्याची पत्नी लैला या दोघांनी खूप धनलाभ होईल या अंधविश्वासामुळे हे कृत्य केले आहे. यात मोहम्मद शफी उर्फ राशीद या तांत्रिकाची मदत घेण्यात आली असून दोन महिलांचा गळा दाबून हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी या तिघांना अटक केली त्यानंतर हे कृत्य उघडकीस आले. दरम्यान त्यांना 26 ऑक्टोबर पर्यंत कोठडी देण्यात आली आहे.
भगवानच्या घरी पोलिसांनी तपास केला असता तेथे दोन महिलांच्या मृतदेहाचे 56 तुकडे सापडले आहेत. तसेच रक्त घराच्या परिसरात शिंपडले तर बळीनंतर त्यांचे मांस शिजवून खाण्यात आल्याचे समोर आले आहे. रोझेलिना आणि पद्मा अशी त्या बळी दिलेला महिलांची नावे आहेत.
या दोघींचा अचानक बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिस स्थानकात दाखल झाली. त्यासंबंधी तपासात त्यांचा बळी दिल्याचे स्पष्ट झाले.