Two youths from Sawantwadi seriously injured in Kariwade-Pedwe accident
ज्युपिटर दुचाकी आणि इनोव्हा यांच्यात झालेल्या अपघातात सावंतवाडी येथील दोन युवक गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी दुपारी सावंतवाडी – बेळगाव या आंतरराज्य महामार्गावर कारिवडे पेडवे नजीक घडली.चिन्मय चितारी (वय 16) आणि सर्वेश गावडे (वय 16) अशी जखमी युवकांची नावे आहेत.
ज्युपिटर गाडीवरून हे दोन्ही युवक सावंतवाडी येथे येत होते. तर गुजरात बडोदा येथील पर्यटकांची इनोव्हा कार गोवा सावंतवाडीतून कोल्हापूर कडे जात होती. याचवेळी धोकादायक वळणावर या युवकांचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने त्यांच्या दुचाकीची जोरदार धडक इनोव्हा कारला बसली.
या अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी या दोन्ही युवकांना तात्काळ सावंतवाडी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अधिक उपचारासाठी गोवा बांबुळी येथे हलविण्यात आले.दरम्यान या अपघाताची माहिती मिळताच सावंतवाडी पोलीस उपनिरीक्षक गुरुनाथ भागवत आणि पोलीस धनंजय नाईक यांनी घटनास्थळी जात पंचनामा केला.
ओटवणे प्रतिनिधी