128 दशलक्ष डॉलर्सची शस्त्रास्त्रs मिळणार
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
रशिया-युक्रेन युद्ध हे 19 महिन्यांपासून सुरू आहे. याचदरम्यान युक्रेनला पुन्हा एकदा अमेरिकेकडून भरीव मदत मिळाली आहे. अमेरिका युक्रेनला नव्या सुरक्षा सहाय्याच्या अंतर्गत 128 दशलक्ष डॉलर्सची शस्त्रास्त्रs अन् उपकरणे पुरविणार आहे. अमेरिकेचे विदेशमंत्री एंटनी ब्लिंकेन यांनी याची माहिती दिली आहे.
संरक्षण मंत्रालयाकडून 197 दशलक्ष डॉलर्सची अतिरिक्त शस्त्रास्त्रs अन् उपकरणे पुरविण्यात येणार आहेत. विदेश मंत्री ब्लिंकेन यांनी ही घोषणा युक्रेनचे अध्यक्ष वोल्दोमिर झेलेंस्की यांच्या अमेरिका दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर केली आहे. यापूर्वी झेलेंस्की यांनी अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांची व्हाइट हाउसमध्ये भेट घेतली होती.
युक्रेनला पुरविण्यात येणारी शस्त्रास्त्रs अन् उपकरणे रशियाच्या हवाई हल्ल्यांच्या विरोधात युक्रेनला हवाई रक्षण मजबूत करण्यास सहाय्यभूत ठरणार आहे. सुरक्षा सहाय्यामध्ये दारूगोळा, सुरक्षा यंत्रणेसोबत अनेक शस्त्रास्त्रs दिली जाणार असल्याचे ब्लिंकेन यांनी सांगितले आहे.
अमेरिकेकडून युक्रेनला पुरविण्यात येणाऱ्या शस्त्रास्त्रांमध्sय अतिरिक्त वायु रक्षण सामग्री सामील आहे. ही सामग्री आगामी हिवाळ्यात रशियाच्या हवाई हल्ल्यांच्या विरोधात युक्रेनच्या हवाई सुरक्षेला मजबूत करण्यास मदत करणार असल्याचे ब्लिंकेन यांनी म्हटले आहे.
अमेरिकेत रिपब्लिकन पार्टीकडुन युक्रेनला शस्त्रास्त्रांची अधिक मदत करण्यास विरोध केला जात आहे. या पार्श्वभूमीवर झेलेंस्की यांनी बिडेन यांच्यासोबतच्या चर्चेदरम्यान अमेरिकेच्या मदतीशिवाय युक्रेन रशियाला सामोरा जाऊ शकत नसल्याचे वक्तव्य केले होते.