ऑनलाईन टिम : नवी दिल्ली
सध्या सोशल मिडीयावर गाजत असलेला रेशनशिवाय तिरंगा हा व्हिडीयो आपल्या ट्विटर हँडलवरून शेअर करत भारतीय जनता पक्षाचे (भाजप) खासदार वरुण गांधी यांनी सोमवारी स्वताच्या पक्षावर आणखी एक हल्ला चढवला आहे. हे खुपच दुर्देवी आहे असे म्हणून त्यानी हा व्हिडीयो शेअर केला आहे आणि असा आरोप केला की नागरिकंना किराणा सामान खरेदी करण्यासाठी सरकारमान्य रेशन दुकानात जातात तेव्हा त्यांना “२० रुपयांना राष्ट्रीय ध्वज” खरेदी करण्यास भाग पाडले जात आहे.
भाजपचे खासदार असलेले वरूण गांधी यांनी हरियाणाच्या कर्नालमध्ये एका वृत्तवाहिनीने शूट केलेला व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडियोमध्ये लोक आरोप करताना दिसत आहेत, सरकारी डेपोमध्ये रेशन खरेदि करण्यासाठी त्यांच्यावर तिरंगा खरेदी करण्यासाठी 20 रुपये देण्यास भाग पाडले जात आहे.
गरीब व्यक्तीचे अन्न हिसकावून प्रत्येक भारतीयाच्या हृदयात राहणाऱ्या ‘तिरंग्या’ची किंमत कमी करणे ‘लज्जास्पद’ आहे, असे त्यांनी हिंदीत केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. रेशन घेणार्या प्रत्येक व्यक्तीने 20 रुपयांना ध्वज विकत घ्यावा आणि तो त्यांच्या घरी लावावा, असे शासनाकडून आदेश प्राप्त झाले आहेत. त्यामुळे “ध्वज खरेदी करण्यास नकार देणार्या लोकांना रेशन देऊ नका” असा प्रशासनाचा आदेश खेदजनक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.