सावंतवाडी : प्रतिनिधी
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे मुंबईत पालकमंत्री तथा राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी स्वागत केले. यावेळी गृहमंत्री शहा यांनी केसरकर यांच्याशी स्मित हास्य केले. श्री शहा आज एक दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. मुंबईत त्यांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही निवासस्थानी त्यांनी गणरायाचे दर्शन घेतले. मुंबईत दाखल होताच गृहमंत्री अमित शहा यांचे विमानतळावर राज्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबईचे पालकमंत्री केसरकर यांनी त्यांचे स्वागत केले. श्री शहा मुंबईच्या एक दिवसाच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी खास गणरायाचे दर्शन घेतले.