देवगड : प्रतिनिधी
देवगड पोलीस ठाणे कार्यक्षेत्रामध्ये कुणकेश्वर समुद्रकिनारी खडकाळ भागामध्ये एक पुरुष जातीचा मृतदेह आढळून आला असून सदरच्या मृत व्यक्तीचा उजवा हात, उजव्या पायाचा पंजा तसे डाव्या पायाचा पंजा हा जलचर प्राण्यांनी कुरतडून खाल्लेला आहे असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय . सदर व्यक्तीने अंगामध्ये गडद ब्ल्यू रंगाची हाफ पॅन्ट व निळ्या रंगाचा टी-शर्ट परिधान केलेला आहे. वय सर्वसाधारण 40 वर्षे ,असल्याचे दिसून येते . सदर मृतदेहाची ओळख अजून पटली नाही आहे . त्यामुळे ओळख पटवण्याचे आव्हान आता देवगड पोलिसांसमोर आहे. सदर वर्णनाची व्यक्ती आपल्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत नापत्ता झालेली असल्यास देवगड पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन देवगड पोलीस निरीक्षकांनी केले आहे .
Previous Articleसुश्राव्य कीर्तनाने कारागृहातील बंदिवान मंत्रमुग्ध !
अनुजा कुडतरकर
Anuja Kudtarkar | journalist # NEWS EDITOR # scriptwriter and content producer at tarun bharat news sindhudurg
Related Posts
Add A Comment