आरोस ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रसाद नाईक यांची बिनविरोध निवड झाली आहे. इतर सहकाऱ्यांना संधी मिळावी, यासाठी सरिता नाईक यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागी शुक्रवारी निवड झाली. त्यांची निवड जाहीर होताच सरपंच शंकर नाईक, माजी उपसरपंच सरिता नाईक, ग्रा. पं. सदस्य मोहिनी नाईक, विश्वजित कलांगुटकर, योगेश नाईक, राजन नाईक, अनिल सावंत, सहदेव नाईक, फटी नाईक, गौरेश नाईक, बाबू परब, सतीश नाईक, दत्ताराम नाईक, संजय कलंगुटकर आदींनी पुष्पहार घालून त्याचे अभिनंदन केले.
अनुजा कुडतरकर
Anuja Kudtarkar | journalist # NEWS EDITOR # scriptwriter and content producer at tarun bharat news sindhudurg
Related Posts
Add A Comment