बेळगाव – भटक्या कुत्र्यांच्या नसबंदी संदर्भात नगर विकास विभाग तसेच पशुसंवर्धन व पशुवैद्यकीय सेवा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने परिपत्रक जारी करण्यात आले आहे. सध्या अनेक ठिकाणी भटक्या कुत्र्यांमुळे नाहक त्रास जनतेला सहन करावा लागत आहे याचा विचार करून राज्यातील सर्व नगरपालिका, नगरसभा, नगरपंचायत यांच्यासाठी भटक्या कुत्र्यांची पैदास नियंत्रण योजना हाती घेण्यासंदर्भात परिपत्रक जारी करण्यात आले आहे.
अलीकडे भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याने अनेक जण जखमी झाले आहेत तर अनेकांना प्राण ही गमवावे लागले आहेत. या पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थांनी भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा यासाठी प्राधान्य देण्यात यावे असे सूचित करण्यात आले आहे. भटक्या कुत्र्यांच्या पैदास नियंत्रण योजनेची पद्धतशीर अंमलबजावणी केल्यास भटक्या कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यास तसेच कुत्र्यांचा चावा घेणे आणि रेबीजवर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल.
Previous Articleकसब्यात बाळासाहेब दाभेकरांची बंडखोरी, रॅली काढत भरला अर्ज
Next Article …तर चिंचवडची पोटनिवडणूक अवघड नाही!
Related Posts
Add A Comment