बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाने अलिकडेच कान्स चित्रपट महोत्सवात स्वत:च्या सौंदर्याचा ठसा उमटविला होता. अभिनेत्री आता लवकरच बॉलिवूडमधील दिग्गज कलाकार परवीन बाबी यांची व्यक्तिरेखा साकारणार आहे. परवीन बाबी यांना बॉलिवूडमधील यशस्वी अभिनेत्रींपैकी एक मानले जाते.
उर्वशीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली असून यात या बायोपिकची माहिती तिने दिली आहे. हा बायोपिक वसीम एस. खान यांच्याकडून तयार केला जाणार आहे. या बायोपिकची कहाणी धीरज मिश्रा लिहिणार आहेत. हा चित्रपट उर्वशीच्या कारकीर्दीसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. या चित्रपटात परवीन बाबींच्या वैयक्तिक आयुष्यासोबत बॉलिवूडमधील कारकीर्दीची झलक दिसून येणार आहे.
बॉलिवूडमध्ये मला फारसे यश मिळविता आले नाही, परंतु परवीन बाबी यांना अभिमान वाटेल अशी भूमिका साकारेन असे उर्वशीने नमूद पेले आहे. उर्वशीच्या या पोस्टनंतर चाहते तिला नव्या भूमिकेसाठी शुभेच्छा देत आहेत.
परवीन यांनी 1972 मध्ये मॉडेलिंगद्वारे स्वत:ची कारकीर्द सुरू केली होती. 1973 मध्ये चरित्र चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले होते. चित्रपटांमध्ये त्यांनी एकाहून एक सरस भूमिका साकारल्या होत्या. परवीन यांचे वैयक्तिक आयुष्यही अत्यंत चर्चेत राहिले होते. अभिनेत्रीचे नाव अनेक कलाकारांसोबत जोडले गेले होते. 22 जानेवारी 2005 रोजी परवीन यांचे निधन झाले होते.