योजना सज्ज असल्याचे सूत्रांचे म्हणणे, भारताला प्रस्ताव दिला जाणार
वॉशिंग्टन / वृत्तसंस्था
भारताला 4 अब्ज डॉलर्सचे (साधारणतः 31 हजार कोटी रुपये) अतिरिक्त अर्थसाहाय्य देण्याचा विचार अमेरिका करीत आहे. हे साहाय्य आतापर्यंत प्रस्तावित केलेल्या अब्जावधी डॉलर्सच्या शिवाय आहे, अशी महत्वपूर्ण माहिती सूत्रांनी दिली आहे. सोमवारी दोन्ही देशांनी या संदर्भात एका महत्वाच्या करारावर स्वाक्षऱया केल्या असून अमेरिकेचे भारताला साहाय्य असेच सुरु ठेवण्याची तरतूद या करारात आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे, अशी माहिती देण्यात आली,.
अमेरिकेने गेल्या दोन वर्षांमध्ये भारताला 5.8 अब्ज डॉलर्सची आधारभूत गुंतवणूक दिली आहे. कोरोना लसीचे उत्पादन, आरोग्य सेवा, पुनउ&पयोगी ऊर्जा निर्मिती, आर्थिक पायाभरणी आणि पायाभूत सुविधा निर्मिती आदी अनेक भारतीय प्रकल्पांसाठी हे साहाय्य देण्यात आले आहे. यापैकी 2.9 अब्ज डॉलर्सचे साहाय्य अद्याप पोहचलेले नाही. मात्र, या नव्या 4 अब्ज डॉलर्सच्या साहाय्याचा संबंध या गुंतवणुकीशी नाही. हे त्याशिवायचे साहाय्य असून लवकरच भारतासमोर याचा प्रस्ताव ठेवण्यात येणार नाही, अशीही माहिती देण्यात आली.
टोकिओ येथे चर्चा
जपानची राजधानी टोकिओ येथे सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी क्वाडच्या परिषदेत भाग घेण्यासाठी गेलेले आहेत. त्यांच्यासमवेत अधिकाऱयांचे एक दल गेले आहे. या अधिकाऱयांनी अमेरिकेच्या अधिकाऱयांशी आर्थिक सहकार्यासंबंधी सविस्तर चर्चा केली. या चर्चेनंतर अतिरिक्त साहाय्याची योजना समोर आली आहे.