क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव संघटना व राणी चन्नम्मा विद्यापीठा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आरसीयु सिंगल झोन शरीरसौष्ठव स्पर्धेत लिंगराज महाविद्यालयाच्या व्ही. बी. किरण याने आपल्या पिळदार शरीराच्या जोरावर मि. राणी चन्नम्मा किताब पटकाविला.
या स्पर्धेत जवळपास 50 हून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला होता. त्यामध्ये 60 किलो वजनी गटात – 1) मंदार देसाई (आरपीडी) 2) विशाल निलजकर (आरपीडी) 3) रुपेश पाणके (सदलगा). 65 किलो गट – 1) रोहण पालणकर (जैन) 2) संदिप मल्यागोळ (चिकोडी) 3) मोहम्मद अत्तार एन. (जमखंडी). 70 किलो गट – 1) किशोर कुरबर (आदर्श) 2) सुफियान मुल्ला (बीके) 3) मोरेश देसाई (गोगटे). 75 किलो गट – 1) विनीत हणामशेठ (भुतरामहट्टी) 2) इनामुल हुसेन कुरेशी (विजापूर). 80 किलो गट – 1) आदित्य पाटील (जैन) 2) युवराज शिंदे (आरपीडी). 85 किलो गट – 1) श्रीनिक मुंगारी (बीके) 2) विष्णू काकतकर (बीके). 90 किलो गट – 1) व्ही. बी. किरण (लिंगराज) यांनी विजेतेपद पटकाविले. त्यानंतर मि. आरसीयु किताबासाठी रोहण पालणकर, किशोर कुरबर, विनित हणमशेठ, आदित्य पाटील, श्रीनिक मुंगारी, व्ही. बी. किरण, मंदार देसाई यांच्यात लढत झाली. त्यामध्ये व्ही. बी. किरणने आपल्या पिळदार शरीराच्या जोरावर आरसीओ किताब पटकाविला. यावेळी पंच म्हणून हेमंत हावळ, नूर मुल्ला, नलवडे, सुनिल राऊन आदींनी काम पाहिले तर क्रीडानिर्देशक गस्ती, रामराव, रामकृष्ण आर., सुशांत पाटील आदी उपस्थित होते.