एका वेब शोमध्ये करणार काम
अनेक दिवसांपासून अभिनेत्री वाणी कपूर मोठय़ा पडद्यावरून गायब ओ. परंतु आता ती ओटीटीवर नव्या शैलीत दिसून येणार आहे. वाणी एका वेब शोमध्ये काम करणार आहे. या शोची निर्मिती यशराज फिल्म्सकडून केली जात आहे. ‘मर्दानी’चे लेख गोपी पुथरान मेगाफोन यात साथ देणार आहेत. वाणी आणि गोपी यांनी या शोमध्ये काम करण्यास सुरुवात केली आहे. अभिनेत्रीने त्याच्यासाब्sात पटकथा वाचनाचे काम हाती घेतले आहे.
या वेबसीरिजचे चित्रिकरण लवकरच सुरू होणार आहे. वाणी यापूर्वी चंदीगड करे आशिकी या चित्रपटात दिसून आली होती. वाणी आता क्राइम थ्रिलरमध्ये दिसून येणार आहे. याची निर्मिती यशराज फिल्म्सकडून केली जात असल्याने चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. रोमांचक थ्रिलरमध्ये स्वतःला झोकून देत भूमिका साकारणाऱया अभिनेत्रीचा शोध गोपी घेत होते. वाणी कपूरचा चित्रपटांमधील अभिनय पाहता त्यांनी तिची निवड केल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
ही वेबसीरिज कधी आणि कुठल्याही प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार हे अद्याप समोर आलेले नाही. तसेच सीरिजमधील अन्य कलाकारांची माहितीही अद्याप उपलब्ध झालेली नाही. ओटीटीवरील वाणीचे या सीरिजद्वारे पदार्पण होणार असल्याने ती अत्यंत उत्सुक आहे.