मडगाव : गोवा बोर्ड 12वी परीक्षेतील टॉपर वैष्णवी पोतेकर हिचा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी वैष्णवी पोतेकर हिचे अभिनंदन केले आणि संस्थेला शुभेच्छा दिल्या. यावेळी डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्यो, रवळू शेट्यो (अध्यक्ष, मराठा शिक्षण संस्कृती मंडळ), डॉ. एस. टी. पुट्टाराजू (अध्यक्ष, एस्टेलर एज्युकेशनल ट्रस्ट), योगेंद्र सिंग सिकरवार (प्राचार्य, एस्टेलर एचएसएस ऑफ एक्सलन्स) आणि वैष्णवी पोतेकरच्या मातोश्री श्रीमती उज्वला पोतेकर उपस्थित होत्या. एस्टेलर हायर सेकेंडरी स्कूल ऑफ एक्सलन्स बारावी परीक्षा 2023 मधील उत्कृष्ट निकालामुळे चर्चेत आहे. या परीक्षेत वैष्णवी पोतेकर ही एस्टेलर हायर सेकंडरी स्कूल ऑफ एक्सलन्सची विद्यार्थिनी अव्वल ठरली आहे. गोवा बोर्ड बारावीच्या परीक्षेत वैष्णवीने 97 टक्के गुण मिळवले आहेत, जे विज्ञान शाखेत राज्यात सर्वाधिक आहे. अभियांत्रिकी व वैद्यकीय स्पर्धात्मक परीक्षेत आश्चर्यकारक परिणाम निर्माण करण्याचा वारसा एस्टेलरने कायम ठेवला आहे. एस्टेलर हायर सेकंडरी स्कूल ऑफ एक्सलन्सचे प्राचार्य योगेंद्रसिंग सिकरवार म्हणाले की, ‘आमच्यासाठी हा अभिमानाचा क्षण आहे, कारण आमची विद्यार्थिनी वैष्णवी पोतेकर हिने गोवा राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
बोर्ड 12वी परीक्षा 2023 मध्ये एस्टेलरच्या एकात्मिक कार्यक्रमातून 17 विद्यार्थ्यांनी 90 टक्क्या पेक्षा जास्त गुण मिळवले. आमचे विद्यार्थी तुषार, आदित्य आणि पार्थने जेईई मेन 2023 मध्ये 99 टक्के पेक्षा जास्त गुण मिळवले आहेत. एकूण 18 विद्यार्थ्यांनी 90 टक्के पेक्षा जास्त गुण मिळवले आहेत. 2019 मध्ये एस्टेलरची स्थापना झाल्यापासून, आम्ही दरवषी स्पर्धात्मक तसेच बोर्ड परीक्षांमध्ये राज्य टॉपर्स दिले आहेत. 2019 मध्ये सुमुख फळगावकर 2020 मध्ये 12वीच्या परीक्षेत राज्यात अव्वल आला होता. आकाश कामत हा 12वीच्या केंद्रीय परीक्षेत राज्यात टॉपर होता. 2020 मध्ये साक्षी हंगरगेकर ऱ्ऊएं स्टेज 1 मध्ये राज्यातून अव्वल ठरली होती. 2021 मध्ये अभिदा बार्रेटो नीट मध्ये राज्यातून अव्वल आली. 2022 मध्ये खुशी कडोली राज्यात जीटीएसई मध्ये अव्वल आली. तर 2023 मध्ये वैष्णवी पोतेकर ही गोवा बोर्ड 12वी परीक्षा 2023 मध्ये राज्य टॉपर आहे.
दरवषी आम्ही चांगल्या निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. आमच्या विद्यार्थ्यांच्या सरासरी गुणांमध्येही मागील वर्षांच्या तुलनेत प्रचंड वाढ झाली आहे. बोर्ड तसेच स्पर्धा परीक्षांमध्ये उत्कृष्ट निकाल देण्याचा हा वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेत आहोत. सर्वांच्या पाठिंब्याबद्दल धन्यवाद आणि आम्ही भविष्यातही असेच परिणाम देण्याचे वचन देतो.’ असे प्राचार्य योगेंद्रसिंग सिकरवार म्हणाले. वैष्णवी पोतेकर म्हणाल्या, ‘एस्टेलरमध्ये शिक्षक त्यांच्या संबंधित विषयात खूप चांगले आहेत आणि नेहमी शंकांसाठी उपलब्ध असतात. एस्टेलरमध्ये स्पर्धात्मक तसेच बोर्ड परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना तयार केले जाते. मी एस्टेलर हायर सेकंडरी स्कूल ऑफ एक्सलन्सचा विद्यार्थी आहे, जो एकात्मिक शालेय कार्यक्रम आहे. माझे वर्ग संध्याकाळी 3:30 पर्यंत संपत असे. मी शाळेनंतरच्या वेळेचा उपयोग प्रŽांचा सराव आणि स्व-अभ्यासासाठी केला. नीट, जेईई आणि अगदी बोर्ड परीक्षांच्या वास्तविक पेपरच्या स्वरूपावर आधारित नियमित चाचण्या खरोखरच उपयुक्त होत्या. आम्हाला विशेष अभ्यास सामग्री प्रदान करण्यात आली, ज्यामध्ये सराव प्रŽांचा समावेश होता, माझ्या यशानंतर, माझा धाकटा भाऊ देखील एस्टेलर अकादमीमध्ये दाखल झाला आहे. ज्या विद्यार्थ्यांना नीट, जेईई व आयआयटी करायचे आहे आणि बोर्डात टॉप व्हायचे आहे त्यांना एस्टेलर अकादमी मध्ये होण्यासाठी शिफारस करते असे वैष्णवी पोतेकर म्हणाल्या. एस्टेलर अकादमीने 2019, 2020, 2021, 2022 आणि 2023 मध्ये मडगाव, पर्वरी आणि वास्को येथील शाखांमधून उत्कृष्ट निकाल दिले आहेत.