मराठा मंदिर येथे रोवण्यात आली मुहूर्तमेढ : विविध प्रकारच्या एकूण 90 स्टॉल्सची उभारणी
बेळगाव : मराठा मंदिर येथे फेम फिएस्टाची मुहूर्तमेढ नुकतीच रोवण्यात आली. यावेळी डॉ. अनुपमा जोशी, जयश्र्री जोशी, अरुणा नाईक, डॉ. जनार्दन नाईक, आनंद चौगुले, अमरदीप पाटील व रश्मी मोहिते उपस्थित होत्या. दि. 19 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या उत्सवात दुपारी 12 वाजता शालेय मुलांसाठी कलरिंग स्पर्धा तीन गटात होतील. 2 री ते 4 थी प्रथम गट, 5 वी ते 7 वी द्वितीय गट व 8 वी ते 10 वीचा तिसरा गट असेल. छापील चित्रासह कागद पुरविला जाईल. रंग कोणतेही चालतील. स्पर्धकांनी स्वत:चे रंग आणावेत. वेळ 45 मिनिटे असून प्रवेश फी नाही. कॉलेज मुली व महिलांसाठी दुपारी 1 वाजता कुकरी स्पर्धा होतील. त्यासाठी व्हेज सॅलेड व तिळाचे गोड पदार्थ बनवायचे आहेत. दोन्ही पदार्थ घरी करून आणावयाचे असून मांडणीसाठी 15 मिनिटे दिली जातील. पाककृती लिखित हवी. स्पर्धक एक किंवा दोन्ही स्पर्धेत भाग घेऊ शकतात. यासाठी प्रवेश फी नाही.
वरील दोन्ही स्पर्धांच्या अधिक माहितीसाठी तेजल खोडा 9731455011 किंवा दिव्या मेहता 9742080727 यांच्याशी संपर्क साधावा. ‘पिंक समोसा’च्या सहयोगाने होणाऱ्या स्पर्धेसाठी आकर्षक बक्षिसे असून महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. सकाळी 10 ते रात्री 10 पर्यंत होणाऱ्या या उत्सवात साड्या, डेसेस, सौंदर्य प्रसाधने, आभूषणे, एक्सेसरीज, गृह सजावटीच्या वस्तू, घरातील व बागेतील रोपे, या व्यतिरिक्त चविष्ठ खाद्यपदार्थांचे एकूण 90 स्टॉल्स असतील. बेळगाव, हैद्राबाद, बेंगळूर, शिमोगा, हासन, कोल्हापूर, पुणे, मुंबई, हुबळी, इचलकरंजी, गडहिंग्लज, गोव्याहून येणाऱ्या स्टॉलधारकांच्या आकर्षक वस्तुंच्या खरेदीचा आनंद लुटता येईल. सायंकाळी पाचनंतर महिलांचा सत्कार व समूहनृत्याचा कार्यक्रम असेल. फेम फिएस्टाचे हे शेवटचे वर्ष असल्याने बहुसंख्येने महिलांनी भेट देऊन लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. अनुपमा जोशी यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी 9480787820 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.