कोलकाता
अनिल अग्रवाल यांच्या मालकीची वेदांत लिमिटेडने विलगीकरण प्रक्रियेला हिरवा कंदील दाखवला असून आता समूह आपल्या 6 कंपन्या स्वतंत्रपणे वेगळ्या करणार आहे.
सदरच्या प्रस्तावाला संचालक मंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळाली आहे. या मंजुरीनंतर 6 कंपन्या स्वतंत्रपणे कार्यभार हाताळणार आहेत. सदरची प्रक्रिया ही पुढील 12 ते 15 महिन्याच्या कालावधीत पूर्ण केली जाणार आहे. या विलगीकरणामुळे विविध कंपन्यांमध्ये गुंतवणूकीला संधी असणार आहे.
अशा असणार स्वतंत्र कंपन्या
विलगीकरण झाल्यानंतर वेदांत अॅल्युमिनीयम, वेदांत ऑईल अँड गॅस, वेदांत पॉवर, वेदांत स्टील अँड फेरस मटेरियल्स, वेदांत बेस मेटल्स आणि वेदांत लिमिटेड यानावाने कंपन्या स्वतंत्रपणे कार्यभार करु शकणार आहेत. या विलगीकरणानंतर कंपनी प्रत्येक एक समभागाच्या बदल्यात एक समभाग समभागधारकांना देऊ करणार आहे. प्रत्येक कंपनीचे स्वतंत्र संचालक मंडळ असेल.