भरत सातोस्कर
पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांची संकल्पना
सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्वच्छ, सुंदर तसेच आतील व बाहेरील परीसरात नागरीकांना किंवा तक्रारदारांस आपण नेमके कुठे जावे. कोणास भेटावे. तक्रार कुणाकडे द्यावी. त्याचे माहिती त्याचप्रमाणे सध्या सर्रासपणे घडणाऱ्या वेगवेगळ्या – गुन्ह्यात नागरीकांना घ्यावयाची खबरदारी याचे सचित्र माहिती देणारी भित्तीपत्रके वेंगुर्ल पोलीस स्टेशनच्या इमारतीवर छळकली आहेत. हेच पोलीस स्टेशन आहे, हे समजण्यासाठी पोलीस स्टेनशच्या गेटवर पुरूष व महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या वेशातील चित्रे दोन्ही बाजूस असल्याने हेच पोलीस स्टेशन हे या चित्रावरून स्पष्ट होते. अशा पध्दतीने परीसर स्वच्छतेसह टापटिप केलेले वेंगुर्ले पोलीस स्टेशन हायटेक झालेले असून सर्व पोलीस स्टेशनात ते आदर्शवंत बनल्याच्या प्रतिक्रीया समाजिक कार्यकर्ते व नागरीकांतून व्यक्त होत आहेत.वेंगुर्ले पोलीस स्टेशनच्या गेटबाहेर तसेच पोलीस स्टेशन परीसरातील भिंतीवर नागरीकांना गुहे व त्याबाबतचे मार्गदर्शन देणारी भित्ती चित्रे सर्वाचीच लक्ष वेधून घेणारी ठरली आहेत. हि संकल्पना पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी राबविली आहे.पोलीस स्टेशनच्या आवारातील भिंतीवर काढण्यात आलेल्या भित्तीचित्रात कोणत्या गुन्ह्याप्रमाणे कोणती खबरदारी घ्यावी. याचे मार्गदर्शन करणारी पुढील माहिती आहे.
पोलीस स्टेशनच्या आवारातील भिंतीवर काढण्यात आलेल्या भित्तीचित्रात गुन्ह्याप मागे कोणती व्हाबरदारी घ्यावी. याचे मार्गदर्शन करणारी पुढील माहिती आहे.
■ सायबर बुलींग मध्ये स्त्रियांना व मुलांना धमकी देऊन त्यांना मानसिक त्रास दिला जातो.
■ अश्लील किंवा हानिकारक संदेश, टिप्पण्या आणि प्रतिमा / व्हिडिओ पाठवून एखाद्याला त्रास देण्यासाठी इंटरनेट किंवा मोबाईल तंत्रज्ञानाचा वापर केला जातो.
■ सायबर गुन्हे करणारी व्यक्ती मजकुर संदेश, ई-मेल, सोशल मिडिया प्लॅटफॉर्म, वेबपृष्ठे, चॅटरूम इत्यादिचा वापर करतात.
■ यामुळे विद्यार्थ्यांच्या शारीरिक, भावनिक सामाजिक आणि मानसिक जीवनात गंभीर परीणाम होतात.
■ अफवांना बळी पडल कायदा हातात घेऊ नका! अफवा पसरविणे हा गुन्हा आहे. सोशल मीडियावरील बातमीची खात्री करा.
इंटरनेट वापरताना घ्यावयाची दक्षता
■ इंटरनेटच्या माध्यमातून अनोळखी व्याक्तीस आपली वैयक्तीक अथवा कुटुंबाविषयी (पूर्ण नाव, पत्ता, फोन नंबर्स, पासवर्ड, फोटो इ.) माहिती देऊ नका. चुकीच्या खोट्या बातम्या देश निर्माण करूशकणारी भाषणे व अशा प्रकारची माहिती इंटरनेट पोस्ट करू नये, नेट बँकींग करताना सार्वजनिकरित्या वापरल्या
जाणाऱ्या संगणकाचा वापर करू नका. ऑनलाईन ओळख असलेल्या मित्रांना प्रत्यक्ष भेटण्यापूर्वी पालकांना कल्पना द्यावी. तुमची मुले इंटरनेटवर काम करीत असताना ते काय करीत आहेत यावर नेहमी लक्ष ठेवा.
■ अनोळखीच्या व्यक्तीने ई-मेल करून पाठविलेल्या लिंकवर क्लिक करु नये.
■ इंटरनेटसाठी ठेवण्यात येणारा पासवर्ड सतत बदलत रहा, सद्या सर्रासपणे इंटरनेटच्या माम्यमातून मोठ्या प्रमाणांत नागरीकांची फसवणुक होत आहे. त्यामुळे इंटरनेटसाठी जो पासवर्ड वापरला आहे, तो कांही कालावधीत बदलत रहा.
लग्नाचे आमिष दाखवून होणारी फसवणूक टाळण्यासाठी घ्यावयाची खबरदारी या संदर्भात नागरीकांत जनजागृतीसाठी विवाह विषयक संकेत स्थळावर फसवणुकिच्या उद्देशाने गुन्हेगार खोट्या आकर्षक प्रोफाईल बनवितात. हस्त करण्याचे आणि दाखवून त्या व्यक्तीची जवळीक साधली जाते. पिडीत ती पैशाची मागणी किंवा एखादे गैरकृत्य करण्यास भाग पडले जाते.
अशा स्वरुपाची नागरीकांसाठी माहिती देणारे सिंधुदुर्गातील वेंगुर्ले पोलीस स्टेशन इतर पोलीस स्टेशनसाठी मार्गदर्शक निश्चीतच ठरू शकणारे आहे.