वृत्तसंस्था/ चेंगडू
एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या चेंगडू पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत जर्मनीच्या टॉप सिडेड अॅलेक्झांडर व्हेरेव्हने एकेरीची अंतिम फेरी गाठली आहे.
या स्पर्धेतील खेळवण्यात आलेल्या उपांत्य सामन्यात व्हेरेव्हने बल्गेरियाच्या डिमिट्रोव्हचा 6-3, 7-6(7-2) असा पराभव करत अंतिम फेरी गाठली आहे. आता रशियाचा रोमन सैफुलीन व व्हेरेव्ह यांच्यात जेतेपदासाठी लढत होईल. रशियाच्या सैफुलीनने द्वितीय मानांकित मुसेटीचा 6-3, 6-4 असा फडशा पाडत अंतिम फेरीत स्थान मिळवले आहे.