बेळगाव : नेहरूनगर येथे विघ्नहर्ता स्पोर्ट्स क्लब आयोजित पहिल्या विघ्नहर्ता बाप्पा चषक हाफपिच क्रिकेट स्पर्धेचे आयोजन गुरूवार दि. 21 रोजी बसवाण्णा मंदिर समोर नेहरूनगर येथे आयोजित करण्यात आले आहे. सदर स्पर्धा प्रकाशझोतात होणार असून, या स्पर्धेतील विजेत्या संघाला 1 लाख 11 हजार 111 रूपये रोख व आकर्षक चषक तर उपविजेत्या संघाला 66 हजार 666 रूपये रोख व चषक देण्यात येणार आहे. या स्पर्धेतील सर्व सामने यू टय़ूब चॅनेलवर प्रसारित करण्यात येणार असून, तिसऱया टीव्ही पंचाची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याशिवाय सामने पाहण्यासाठी प्रेक्षकांना गॅलरी बनविण्यात आली आहे. तरी इच्छुक संघांनी नावनोंदणीसाठी राहुल बडचकर, संतोष बडिगेर, सुरेशकुमार यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Previous Articleरायबंदर-चोडण फेरीबोट प्रवाशांचे दोन दिवस हाल
Next Article इंद्रजीत हलगेकर, ज्योती होसट्टी यांचा सत्कार
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.