बेळगाव – पुणे बंगळुरू महामार्गावर सहा लेनचे काम सुरू असल्याने एका लेनवर संकेश्वरजवळ गर्दी वाढली आहे. आज दुपारी एक मोटारसायकलस्वार गर्दीतून निघून गेला. समोरील ट्रकचा अंदाज आला नाही. आणि मोटारसायकल थेट ट्रकच्या मागच्या टायरमध्ये गेली. ट्रक चालक थांबला परंतु संपूर्ण मोटरसायकलचा चक्काचूर झाला. अखेर काही लोकांनी त्याला ट्रकखालून बाहेर काढले. परंतु सदर युवक जखमी झाला होता. तात्काळ मदतीची गरज होती. त्याच सुमारास विजय मोरे यांची गाडी गर्दीतून मार्गक्रमण करत घटनास्थळी पोहोचली. अपघात झाल्याचे पाहून त्यांनी तात्काळ गाडीतून उतरून घटनास्थळी धाव घेतली. तातडीने अॅम्ब्युलन्स बोलावण्यात आली आणि त्याला तत्काळ उपचार देण्यात आले. अॅलन मोरे व विजय मोरे यांच्या या कार्याबद्दल परिसरातून कौतुक होत आहे.
Related Posts
Add A Comment