नागरिकांतून समाधान : ग्राम पंचायतीने दिले लक्ष
बेळगाव : बेळगाव-वेंगुर्ला रोडवरील हिंडलगा ग्राम पंचायत कार्यक्षेत्रात येणाऱ्या विजयनगर दुसरा बसथांबा येथे पथदीप नसल्याने मोठी गैरसोय निर्माण झाली होती. त्यामुळे या परिसरात पथदीप बसवावेत, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी ग्राम पंचायतीकडे केली होती. याची दखल घेत ग्राम पंचायतीने या ठिकाणी पथदीप बसविले आहेत. त्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.या परिसरात अंधार असल्याने नागरिकांना याचा फटका सोसावा लागत होता. त्यामुळे ग्राम पंचायतींने याकडे तातडीने लक्ष देऊन येथील पथदीप बसवावेत, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली होती. याच रस्त्यावरून श्रीनाथनगर व गोकुळनगरला जाणारा कॉर्नर आहे. त्या ठिकाणीही अंधार पडत होता. येथील नागरिकांना अंधारातच पायवाट शोधावी लागत होती. त्यामुळे समस्या निर्माण झाली होती. याकडे आता ग्राम पंचायतीने लक्ष देऊन पथदीप बसविले आहेत.विजयनगर, दुसरा बसथांबा परिसर अंधारातच याबाबतचे वृत्त ‘तरुण भारत’ने प्रसिद्ध केले होते. याची दखल घेऊन या ठिकाणी पथदीप बसविल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.