उडपीचा नित्यानंद कोटीयान उपविजेता : बेळगावचा उमेश गंगणे उत्कृष्ट पोझर :
बेळगाव : गोकर्ण येथे कर्नाटक राज्य शरीरसौष्ठव संघटना आयोजित ‘मिस्टर महाबला श्री’ राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत बेळगावच्या विकास सूर्यवंशीने आपल्या पिळदार शरीराच्या जोरावर ‘मि. महाबला श्री’ हा मानाचा किताब पटकाविला तर उडुपीच्या नित्यानंद कोटीयानने पहिले उपविजेतेपद पटकाविले. बेळगावच्या उमेश गंगनेने उत्कृष्ट पोझर हा किताब मिळविला.
गोकर्ण येथे आयोजित ही स्पर्धा आयबीबीएफ मुंबईच्या मान्यतेनुसार ही स्पर्धा 8 वजनी गटात घेण्यात आली. निकाल पुढीलप्रमाणे-
55 किलो गट : 1) महम्मद अरिफ (मंगळूर), 2) रोहन अल्लूर (बेळगाव), 3) सलमान खान (शिमोगा), 4) महांतेश (बागलकोट), 5) हेमंतकुमार मादीवल (कारवार), 60 किलो गट : 1) उमेश गंगने (बेळगाव), 2) रोनॉल्ड डिसोजा (मंगळूर), 3)मंजुनाथ सोनटक्की (बेळगाव), 4) राघवेंद्र एम. गौडा (कारवार), 5) नितेश गोरल (बेळगाव). 65 किलो गट : 1) नितीन एम. एस. (शिमोगा), 2) निधी (मंगळूर), 3) ऋषभ वशिष्ट (रायचूर), 4) संपतकुमार (शिमोगा), 5) मंजुनाथ (बेंगळूर). 70 किलो गट : 1) प्रताप कालकुंद्रीकर (बेळगाव), 2) साहेबलाल (विजापूर), 3) फ्रान्सिस नाईक (उ. कन्नडा), 4) सोमशेखर कारवी (उडपी), 5) संदीप उप्पार (कारवार). 75 किलो गट : 1) महेश गवळी (बेळगाव), 2) अफ्रोज ताशिलदार (बेळगाव), 3) श्रवनन एच. (बेंगळूर), 4) मोसिन शेख (कारवार), 5) हुसेन सय्यद (धारवाड). 80 किलो गट : 1) शंकर होण्णावर (कारवार), 2) किशन शेट्टी (कारवार), 3) प्रवीण कणबरकर (बेळगाव), 4) दयानंद निलजकर (बेळगाव), 5) तापसकुमार नायक (चित्रदुर्ग). 85 किलो गट : 1) नित्यानंद कोटीयान (उडपी), 2) जहरसिंग (उडपी), 3) काशिनाथ निलकर (धारवाड), 4) राघवेंद्र नाईक (कारवार), 5) गणेश आनंद गौडा (कारवार). 85 वरील किलो गट : 1) विकास सूर्यवंशी (बेळगाव), 2) गौतम (उडुपी), 3) संकेत मिस्ता (कारवार), 4) राघवेंद्र एल. नाईक (कारवार) यांनी विजेतेपद पटकाविले. त्यानंतर मि. महाबला श्री किताबासाठी महम्मद अरिफ, उमेश गंगणे, नितीन एम. एस., प्रताप कालकुंद्रीकर, महेश गवळी, शंकर होण्णावर, नित्यानंद कोटीयान, विकास सुर्यवंशी यांच्यात लढत झाली. त्यामध्ये विकास सूर्यवंशी व नित्यानंद कोटीयान यांच्यात तुलनात्मक लढत झाली. त्यामध्ये विकास सूर्यवंशीने आपल्या पिळदार शरीराच्या जोरावर मि. महाबला श्री हा मानाचा किताब पटकाविला. तर पहिले उपविजेतेपद उडुपीच्या नित्यांनद कोटीयनने पटकाविले. बेळगावच्या उमेश गंगणेने संगीताच्या तालावर उत्कृष्ट पोझ्ंिागद्वारे उत्कृष्ट पोझर हा मानाचा किताब मिळविला.
मान्यवरांच्याहस्ते विकास सूर्यवंशीला मानाचा किताब आकर्षक चषक, 20 हजार रुपये रोख व प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन तर पहिल्या उपविजेत्या नित्यानंद कोटीयान याला चषक, 10 हजार रुपये रोख देण्यात आले. तर उत्कृष्ट पोझर उमेश गंगणेला 5 हजार रुपये रोख व चषक प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेसाठी जे. निलकंठ, गंगाधर एम., जे. डी. भट, हेमंत हावळ, प्रशांत सुगंधी, नूर मुल्ला यानी पंच म्हणून काम पाहिले.