नागेश संताजी टॉप टेन विजेता, उमेश गंगणे-संकेत यळ्ळूरकर उत्कृष्ट पोझर
बेळगाव ; बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव संघटना व हलगा स्पोर्ट्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने मि. धनंजय जाधव क्लासिक जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत कॉर्पोरेशन जिमच्या विकास सूर्यवंशीने मि. धनंजय जाधव क्लासिक हा मानाचा किताब पटकाविला तर पहिले उपविजेतेपद व उत्कृष्ट पोझर उमेश गंगणे याने पटकाविले आणि हलगा श्री टॉप टेन स्पर्धेत नागेश संताजीने विजेतेपद तर उत्कृष्ट पोझर संकेत यळ्ळूरकर यांनी पटकाविले. हलगा येथे ग्राम पंचायत कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत जवळपास 80 हून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला होता. निकाल पुढीलप्रमाणे- 55 किलो गट- 1) आकाश निंगराणी (चॅम्पियन), 2) जोतिबा बिर्जे (भवानी), 3) नारायण जोशीलकर (मंथन), 4) सुनील भुजनाळ (रॉ फिटनेस), 5) तुकाराम गौडा (बी स्ट्राँग), 60 किलो गट- 1) उमेश गंगणे (एसएसएस फाऊंडेशन), 2) बबन पोटे (रॉ फिटनेस), 3) रोहन अल्लूर (कॉर्पोरेशन), 4) आकाश साळुंखे (रॉयल), 5) कपिल कामाण्णाचे (रॉ फिटनेस), 65 किलो गट- 1) विनायक अनगोळकर (बॉडी बेसिक), 2) नागेश संताजी (श्री समर्थ), 3) विजय निलजी (भैरव फिटनेस), 4) संकेत सुरुतेकर (समर्थ), 5) राहुल हणमंताचे (रॉ फिटनेस), 70 किलो गट -1) सुनील भातकांडे (एस्क्ट्रीम जिम्स), 2) संदीप पावले (युनिव्हर्सल जिम), 3) विनित हणमशेट (रॉ फिटनेस), 4) शिवकुमार पाटील (बी स्ट्राँग), 5) गोपी गणगली (आयएफएफओ हेल्थ फिटनेस), 75 किलो गट- 1) प्रताप कालकुंद्रीकर (पॉलिहैड्रॉन), 2) राहुल हिरोजी (युनिव्हर्सल), 3) विनायक चव्हाण (बॉडी बेसिक), 4) अंकुश टपाले (बॉडी वर्क), 5) सिद्धार्थ नाझरे (फिटनेस फॅक्टरी), 80 किलो गट- 1) गजानन कोकितकर (एसएसएस फाऊंडेशन), 2) प्रशांत पाटील (फिटनेस, खानापूर), 3) संभाजी हणमंताचे (पाटील फिटनेस), 80 किलोवरील गट- 1) विकास सूर्यवंशी (कॉर्पोरेशन), 2) मोहम्मद साकीब (सेव्हन स्टार चिकोडी), 3) राघवेंद्र नाईक (मोरया), 4) सुजित शिंदे (रुद्र), 5) मनोज नाईक (युनिव्हर्सल). त्यानंतर मि. धनंजय क्लासिक स्पर्धेसाठी आकाश निंगराणी, उमेश गंगणे, विनायक अनगोळकर, सुनील भातकांडे, प्रताप कालकुंद्रीकर, गजानन काकतीकर, विकास सूर्यवंशी यांच्यात लढत झाली. त्यामध्ये उमेश गंगणे, प्रताप कालकुंद्रीकर व विकास सूर्यवंशी यांच्यात तुलनात्मक लढत झाली. त्यामध्ये आपल्या पिळदार शरीराच्या जोरावर विकास सूर्यवंशीने मि. धनंजय जाधव क्लासिक हा मानाचा किताब पटकाविला. मान्यवरांच्या हस्ते विजेत्या कॉर्पोरेशनच्या विकास सूर्यवंशीला 11 हजार रुपये रोख, आकर्षक चषक, मानाचा किताब व भेटवस्तू तर पहिल्या उपविजेत्या उमेश गंगणे याला चषक, 5 हजार रुपये रोख, प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. उत्कृष्ट पोझरसाठी उमेश गंगणे, विनित हणमशेट व बसवंत काद्रोळी यांच्यात लढत झाली. त्यामध्ये एसएसएस फाऊंडेशनच्या उमेश गंगणेने उत्कृष्ट पोझरचा किताब पटकाविला. चौथी हलगा श्री टॉप टेन स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत एकूण पंधरा स्पर्धकांनी भाग घेतला होता. त्याचा निकाल पुढीलप्रमाणे- 1) नागेश संताजी, 2) कपिल कामाण्णाचे, 3) राहुल हणमंताचे, 4) पंकज कामाण्णाचे, 5) मंजुनाथ पोटे, 6) सचिन कालिंग, 7) रितेश हणमंताचे, 8) नागराज हणमंताचे, 9) संकेत यळ्ळूरकर, 10) ऋषभ गोवेकर यांनी विजेतेपद पटकाविले. उत्कृष्ट पोझरसाठी नागराज हणमंताचे, संकेत यळ्ळूरकर व बसवंत काद्रोळी यांच्यात लढत झाली. त्यामध्ये संकेत यळ्ळूरकर याने उत्कृष्ट पोझरचा किताब पटकाविला. मान्यवरांच्या हस्ते विजेत्या टॉप टेन स्पर्धकांना पदके, प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. यावेळी गंगाधर एम., एम. के. गुरव, हेमंत हावळ, प्रशांत सुगंधी, सुनील पवार, नूर मुल्ला, नलवडे, अंनिल आंबरोळे यांनी पंच म्हणून तर स्टेज मार्शल म्हणून सुनील राऊत, सुनील अष्टेकर यांनी काम पाहिले.