ओटवणे/प्रतिनिधी: विलवडे येथील शिवप्रेमी मित्रमंडळाच्यावतीने राजा शिवाजी विद्यालय येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण मंगळवारी ६ जुन रोजी सकाळी १० वाजता सावंतवाडी पंचायत समितीचे माजी उपसभापती तथा छत्रपती कला क्रीडा मंडळाचे अध्यक्ष विनायक दळवी यांच्याहस्ते करण्यात येणार आहे.
यानिमित्त मंगळवारी सकाळी ६ वाजता फुकेरी येथील शिवकालीन हनुमंत गडावरून शिवज्योत कार्यक्रम स्थळी निघणार आहे. तसेच विलवडे, भालावल आणि सरमळे ग्रामपंचायत येथून युवक ग्रामस्थ व महिलांचे रॅलीने कार्यक्रम स्थळी आगमन होणार आहे. सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण झाल्यानंतर शिवज्योत प्रज्वलित करण्यात येणार आहे. त्यानंतर छत्रपतींच्या पुतळ्याची पूजा केल्यानंतर ध्वजाचे अनावरण करण्यात येणार आहे. त्यानंतर या स्थळाच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक या नामफलकाचे अनावरण करण्यात येणार आहे.
तसेच यावेळी शिवाजी महाराजांवर व्याख्यान व पोवाडे आदी कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन विलवडे शिवप्रेमी मित्रमंडळाने केले आहे.
Trending
- तोपिनकट्टीत क्षुल्लक कारणावरून दोन गटात हाणामारी
- पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत मंगळवारी होणार जनता दर्शन
- आज शहरातील कचरा उचल होणार नाही
- गौराईच्या जेवणाचा थाट काही औरच
- ‘लोकमान्य’तर्फे पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा
- तिरुपती-कोल्हापूर एक्स्प्रेसच्या प्रवाशांसाठी बसची व्यवस्था
- बेळगाव-वेंगुर्ला रस्त्यावरील घोळ कधी संपणार?
- या परिसरात फिरणार आज फिरते विसर्जन कुंड