देशी पर्यटकांना 10 रुपये अधिक खर्च करावे लागणार
विदेशींवर 100 रुपयांचा वाढणार भार
जगप्रसिद्ध ताजमहालच्या दर्शनाचे तिकीट वाढविण्यास सहमती झाली आहे. देशी पर्यटकाचे प्रवेश तिकीट 10 रुपयांनी वाढून 50 रुपयांऐवजी आता 60 रुपये होणार आहे. विदेशी पर्यटकांसाठी प्रवेश तिकीट 100 रुपयांनी वाढून 1350 च्या 1450 रुपयांचे होणार आहे.
देशी पर्यटकांना ताजमहालमध्ये प्रवेशासह मुख्य गुबंदात जाण्यासाठी 260 रुपये खर्च करावे लागतील. यात 200 रुपयांचे तिकीट मुख्य गुबंदाचे आहे. तर विदेशी पर्यटकांसाठी हा दर 100 रुपयांनी वाढून 1350 च्या ऐवजी 1450 रुपये होणार आहे.
आयुक्त अमित गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या गाइड आणि पर्यटनाशी निगडित संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक पार पडली आहे. एडीए उपाध्यक्ष डॉ. राजेंद पैंसिया, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण आणि पर्यटन विभागाचे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
बैठकीत ताजमहालचे तिकीट दर वाढविण्याचा प्रस्ताव शासनाला पाठविण्यावर सहमती झाली. या प्रस्तावाला पर्यटनाशी निगडित संस्था विरोध करणार नाहीत. मागीलवेळी प्रवेशशुल्क वाढविण्यास मोठा विरोध झाला होता, या विरोधामुळे प्रवेशशुल्क वाढविण्याचा निर्णय स्थगित करावा लागला होता.