वार्ताहर /मच्छे
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने ‘राष्ट्रीय संस्थात्मक गुणवत्ता यादी 2023’ जारी केली आहे. यामध्ये बेळगाव येथील विश्वेश्वरय्या टेक्निकल युनिव्हर्सिटीने (व्हीटीयू) 55 वा क्रमांक पटकावला आहे. बेंगळूर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सने विद्यापीठ श्रेणीत अव्वल स्थान पटकावले आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, दिल्ली दुसऱ्या तर जामिया मिलिया इस्लामिया, दिल्ली तिसऱ्या क्रमांकावर आहे. एकूण 12 श्रेणींमध्ये रँकिंग ऑफर केली जाते. शैक्षणिक संस्थांना शिकविणे आणि शिकणे आणि संसाधने, संशोधन, व्यावसायिक सराव, पदवी परिणाम, समज आदी घटकांच्या आधारे शिक्षण मंत्रालयाकडून क्रमवारी जारी केली जाते. देशातील 8,686 शैक्षणिक संस्थांनी या रँकिंग स्पर्धेत भाग घेतला. यावेळी रँकिंगची 8 वी आवृत्ती शिक्षण आणि परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री डॉ. राजकुमार रंजन सिंह यांच्या हस्ते जारी करण्यात आली.