पुणे / वार्ताहर :
Waiter killed after rice pieces found in mutton soup मटणाच्या सुपामध्ये भाताचे तुकडे आढळल्याने थेट वेटरचा खून करण्यात आल्याने पुण्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगवी पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
मंगेश संजय पोस्ते (वय 19) असे खून झालेल्या वेटरचे नाव आहे, तर अजित अमृत मुठकुळे (वय 32), सचिन सुभाष भवर (वय 22) अशी जखमी व्यक्तींची नावे आहेत. या प्रकरणी विजयराज वाघिरे आणि त्याचा साथीदारावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे दोघे फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या प्रकरणी विशाल महादू रजाळे यांनी सांगवी पोलिसात तक्रार दिली आहे.
अधिक वाचा : शिवसृष्टीच्या पहिल्या टप्प्याचा लोकार्पण सोहळा अमित शाह यांच्या हस्ते
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळे सौदागर येथे एक मटणाचे हॉटेल आहे. या ठिकाणी खानावळ देखील चालवली जाते. आरोपी विजयराज आणि त्याचा मित्र हे नेहमी या ठिकाणी जेवायला जात असत. मंगळवारी देखील हे दोघे जेवणासाठी नेहमीप्रमाणे या खानावळीत जेवण्यासाठी गेले. दरम्यान, त्यांच्या मटणाच्या सूपमध्ये भाताचे काही कण आले. यामुळे आरोपी विजयराज आणि त्याच्या साथीदाराला राग अनावर झाला. त्यांनी वेटर अजित अमृत मुठकुळे, सचिन सुभाष भवर आणि मृत मंगेशला शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. यात मंगेश हा गंभीर जखमी झाला. यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. या नंतर आरोपी आणि त्याचा मित्र हा हॉटेलमधून फरार झाले. त्यांच्या मारहाणीत इतर दोन वेटर देखील जखमी झाले.