सिमला / वृत्तसंस्था
जुनी निवृत्ती वेतन योजना हिमाचल प्रदेशात लागू करण्यासाठी काँगेसने पावले उचलण्यास प्रारंभ केला आहे. पहिल्या वर्षात यासाठी राज्य सरकारच्या तिजोरीतून 800 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. यामुळे राज्यात विरोधी पक्ष असणाऱया भाजपने काँगेसवर टीकेचा भडीमार केला आहे. काँगेसने प्रथम जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्याचे आश्वासन दिले. मात्र, निवडून आल्यानंतर या योजनेच्या खर्चासाठी केंद्राकडेच आठ हजार कोटी रुपये मागण्यास प्रारंभ केला. जुनी निवृत्तीवेतन योजना रद्द करण्याचा निर्णय काँगेसच्याच कार्यकाळात घेण्यात आला होता. नवी निवृत्तीवेतन योजनाही काँगेसच्या काळातच तयार करण्यात आली होती. आता मात्र केवळ मतांसाठी काँग्रेस आपल्याच योजनेशी प्रतारणा करीत आहे, असा आरोप भाजपने केला आहे काँगेसने छत्तीसगड मध्येही असेच आश्वासन दिले होते. तथापी त्या राज्यात अद्यापही ही योजना लागू होऊ शकलेली नाही. काँगेस लोकांची दिशाभूल करत आहे, असाही आरोप होत आहे .