खानापूर प्रतिनिधी : बेळगाव – गोवा – व्हाया – चोर्ला रस्ता अत्यंत खराब झाला असून, या रस्त्यावरून प्रवास करणे धोकादायक बनत आहे. याबाबत चोर्ला येथील कार्यकर्ते किरण गावडे यांनी सदोष मनुष वधाचा गुन्हा दाखल करण्याची इशारा दिल्यानंतर फक्त चिखला क्रॉस येतील चार खड्डे बुजून आपली जबाबदारी झटकली आहे. चोरला ते जांबोटी पर्यंतचा रस्ता पूर्णपणे धोकादायक बनला असून या रस्त्यावरून प्रवास करणे म्हणजे जीवावर बेतण्यासारखे झाले आहे. मात्र शासन याकडे साफ दुर्लक्ष करत आहे याबाबत सार्वजनिक बांधकाम खात्याला विचारल्यावर त्यांनी हा रस्ता सार्वजनिक बांधकाम खात्याकडून नॅशनल हायवेला वर्ग केल्याचे स्पष्ट करत कागदोपत्री पुरावाच दिला आहे. यांनी मात्र ही जबाबदारी झटकत आहेत, त्यामुळे दोघांच्या वादात प्रवाशांना व गावकऱ्यांना नाहक त्रास सोसावा लागत आहे.हा रस्ता नॅशनल हायवेच्या वतीने रुंद करून नव्याने बांधण्यात येणार आहे. याबाबत सर्व बाबांची पूर्तता झाली असून देखील ज्या कंत्राटदाराने हे काम घेतले आहे. ते तात्पुरती डागडुजी करण्यास असमर्थता दर्शवत आहेत. जर येत्या चार दिवसात हा रस्ता वाहतुकीस योग्य केला नाही तर उग्र आंदोलन करण्याचा इशारा किरण गावडे यांनी दिला आहे.
Related Posts
Add A Comment